Author Topic: प्रेमकविता”  (Read 2172 times)

Offline SATISHGAVHALE1970

  • Newbie
  • *
  • Posts: 14
प्रेमकविता”
« on: August 16, 2012, 05:57:50 PM »
“प्रेमकविता”
वाचून एक कवीता
त्याने विचारले एकदा मला
मित्रा..........
हि प्रेम कवीता आहे का रे

प्रेम तरी काय असते
कवीता तरी काय असते
वाटलं सांगाव त्याला
मित्रा जगण्यावर प्रेम असल का
मरणातही प्रेम दिसत
आणी
जगण्यावर प्रेम नसलं का
प्रेमातही मरण दिसतं   

दिवाळीहि फक्तं चार दिवसांचीच असते
काजवाही स्वतापुरताच प्रकाशतो
प्रेम, विरह, त्याग, भावना, हसू, आसू
एकाच झाडाला लागलेल्या ह्या फांद्या
कुणी कशीही चालवली कुऱ्हाड 
वेदना ह्या त्या खोडालाच होतात
आणी म्हणूनच
प्रत्येक कवीता हि प्रेमकाविताच असते
फक्त
जगाव कसं हे समजलं पाहिजे  - सतीश लक्ष्मण गव्हाळे   

Marathi Kavita : मराठी कविता