Author Topic: मज आठवते गं कांही ...  (Read 6964 times)

Offline atulmbhosale

 • Newbie
 • *
 • Posts: 48
मज आठवते गं कांही ...
« on: August 25, 2012, 03:06:12 PM »
मज आठवते गं कांही ...
मज आठवते गं कांही मी तुला पाहिले तेंव्हा
तो चैत आनंदी होता नव पल्लव आले तेंव्हा
नव कोम्बानी तव माझे मन बहरून बहरून गेले
पण कळले नाही मजला ते कशात हरवून गेले
मी हरवून गेलो देहा तव दिशा हर्षल्या दाही
मन पतंग झाले आणि अंतरात फुटली लाही
मज आठवते गं कांही ...

हा सुर  जुळाला म्हणता तू गेली गावी दूर
डोळ्यांत  इशारा होता अन इवला प्रेमांकुर
तो वैशाखाचा मास अन धगधगणारे उन
विरहाची आग अशी का छळ छळते भासातून ?

ढग अवचित जमून यावे वळवाने बरसून जावे
हे आसू असेच का गं  डोळ्यातून झर झर यावे?
 तू चातक धरणीसाठी मृग तुषार होऊन आली
गंधाने भारून आपली तव मने बोलकी झाली

तो गंधित पाऊसकाळ मज देऊन गेला ग्वाही-
'ती जाईल दूर निघुनी घडणार कधी रे नाही'
स्वप्नांच्या हिंदोळ्यावर मग सरले दिस अनेक
मन सुखवीत गेली माझ्या तळहातावरची  रेख
जे मनात होते माझ्या ना कुणा बोललो कांही 
पण ठाऊक झाले सर्वा मज कसे उमगले नाही
मज आठवते गं कांही.......

मौनाला असतो अर्थ मौनाला असते भाषा
हे मौन मनाच्या आत स्वप्नांना देते आशा
तू देशील मजला साथ वा घडेल उलटे कांही
हा विचार कितीक वेळा काळजास चिरून जाई

हा काळच मंतरलेला जो घडवी मनी आकार
स्वप्नातच घडवी राजा अन स्वप्नी साक्षात्कार
सहवास तुझा परिसाचा दगडाचे झाले सोने
मी खुशाल तुडवीत गेलो मार्गातील खडतर राने

तू प्राणच होती माझा तू होती माझा श्वास
मजसाठी अमृत होते तू येतानाचे भास
तू जीवन होती माझे तू होती माझी वाट
मी जगलो दु:खच येथे तू आनंदाची लाट

जे जगण्यासाठी होते ते तसेच राहून गेले
का फुलण्याआधी फुल निर्माल्य होऊन गेले ......
.......... तो गेला वर्षाकाळ  अन थंड गुलाबीजाल
       देहाला जाळीत आला  उन वैशाखाचा काळ
     
 मी विसरू म्हणतो आता पण मजला कळते आहे
 हे इतके नसते सोपे मज आठवण छळते आहे
 मी दिले हृदय जे तुजला ते अजून माझे नाही
 हे कारण असेल बहुधा मी माझा देखील नाही
 मी माझा देखील नाही
  .......मज आठवते गं कांही .........
                           अतुल भोसले kolhapur

                        atulbhosale60@yahoo.in
« Last Edit: September 16, 2012, 08:48:11 PM by atulmbhosale »

Marathi Kavita : मराठी कविता


DEEPAK MANKAR

 • Guest
Re: मज आठवते गं कांही ...
« Reply #1 on: August 27, 2012, 04:34:10 PM »
best poem  atuldada.........
    i like it...
        vaachataana kharach manaapasun saangato मज आठव le re  कांही ...
       

indian

 • Guest
Re: मज आठवते गं कांही ...
« Reply #2 on: August 28, 2012, 07:09:59 PM »
 I LIKE FOWLLING LINES

तू प्राणच होती माझा
तू होती माझा श्वास
मजसाठी अमृत होते
तू येतानाचे भास

तू जीवन होती माझे
तू होती माझी वाट
मी जगलो दु:खच येथे
तू आनंदाची लाट
    AND

           मी दिले हृदय जे तुजला
        ते अजून माझे नाही
        हे कारण असेल बहुधा
        मी माझा देखील नाही
           मी माझा देखील नाही


     NICE.....   

ANIL SAVARTKAR

 • Guest
Re: मज आठवते गं कांही ...
« Reply #3 on: August 29, 2012, 06:34:58 PM »
AGADI MZYAA MANATALE LIHLES. BEST .

Offline sai patil

 • Newbie
 • *
 • Posts: 47
 • Gender: Female
Re: मज आठवते गं कांही ...
« Reply #4 on: August 29, 2012, 10:14:10 PM »
superb

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: मज आठवते गं कांही ...
« Reply #5 on: August 30, 2012, 10:28:42 AM »
sundar kavita...

samikshan

 • Guest
Re: मज आठवते गं कांही ...
« Reply #6 on: September 02, 2012, 12:04:29 PM »
chaangali kavitaaa.
 kedar ne reply dilelya baryaach  kavita changalya aahet.

स्वप्नांच्या हिंदोळ्यावर
मग सरले दिस अनेक
मन सुखवीत गेली माझ्या
तळहातावरची  रेख
         really....

Offline Kranti S

 • Newbie
 • *
 • Posts: 39
 • Gender: Male
 • प्रेम म्हणजे प्रेम असतं...तुमच आमचं सेम नसतं
  • The Poet's Ink
Re: मज आठवते गं कांही ...
« Reply #7 on: September 02, 2012, 08:20:36 PM »
khupach sunadr ahe kavita

Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: मज आठवते गं कांही ...
« Reply #8 on: September 02, 2012, 08:28:23 PM »
खूप मस्त आहे कविता..
 :)

Offline atulmbhosale

 • Newbie
 • *
 • Posts: 48
Re: मज आठवते गं कांही ...
« Reply #9 on: September 04, 2012, 09:45:54 AM »
सर्वांचे मनापासून धन्यवाद !
   Atul