Author Topic: सांगताच आल नाही ....  (Read 5059 times)

Offline RamKumar

 • Newbie
 • *
 • Posts: 5
 • Gender: Male
 • काही माझ्या मनातले
सांगताच आल नाही ....
« on: September 08, 2012, 09:18:32 PM »
सांगताच आल नाही  ....

प्रेमात हे असच असत, करायच असत काही आणि भलतच होऊन बसत

तू मला खुप आवडतेस, बोलण्याकरिता जीभ ही वळत नाही..
जेव्हा असत बोलायच, तेव्हा ओठांना शब्दच मिळत नाही.     

डोळे हे बोलतात, पण ओठ बोलत नाही..
आणि प्रेम डोळ्यातील दाखवायला, नजर ही तिच्या नजरेशी भिडत नाही.

मग तिच्या कड़े, नुसतच पाहत राहायच..
आणि तिने पण चोरून बघून, हसून निघून जायच.

ती निघून गेल्यावर, सुरु व्हायचा विचारांचा खेळ..
मनामध्ये बनायची न बोललेल्या शब्दांची भेळ.
 
कधी तिच्या समोर ही शब्दांची भेळ ठेवताच आली नाही.. 
नंतर नंतर मनता मनता, कधी तिला काही सांगताच आल नाही ........
                                                             ( भुषण रामटेके )


Marathi Kavita : मराठी कविता


Manish Ramteke

 • Guest
Re: सांगताच आल नाही ....
« Reply #1 on: December 16, 2012, 09:58:19 PM »
 CHHAN KAVITA.

Offline SANJAY M NIKUMBH

 • Full Member
 • ***
 • Posts: 502
Re: सांगताच आल नाही ....
« Reply #2 on: December 17, 2012, 06:02:58 AM »
chaan

anant bijagarkar

 • Guest
Re: सांगताच आल नाही ....
« Reply #3 on: December 19, 2012, 10:46:36 PM »
jakkas kavita.

vinod patil

 • Guest
Re: सांगताच आल नाही ....
« Reply #4 on: December 20, 2012, 10:06:12 PM »
सांगताच आल नाही ....
प्रेमात हे असच असत, करायच असत काही आणि भलतच
होऊन बसत
तू मला खुप आवडतेस, बोलण्याकरिता जीभ ही वळत
नाही..
जेव्हा असत बोलायच, तेव्हा ओठांना शब्दच मिळत नाही.
डोळे हे बोलतात, पण ओठ बोलत नाही..
आणि प्रेम डोळ्यातील दाखवायला, नजर
ही तिच्या नजरेशी भिडत नाही.
मग तिच्या कड़े, नुसतच पाहत राहायच..
आणि तिने पण चोरून बघून, हसून निघून जायच.
ती निघून गेल्यावर, सुरु व्हायचा विचारांचा खेळ..
मनामध्ये बनायची न बोललेल्या शब्दांची भेळ.
कधी तिच्या समोर ही शब्दांची भेळ ठेवताच आली नाही..
नंतर नंतर मनता मनता, कधी तिला काही सांगताच आल
नाही ........