Author Topic: हे माझं प्रेम आहे  (Read 5951 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
हे माझं प्रेम आहे
« on: September 08, 2012, 09:51:55 PM »
ती आली आयुष्यात
मी बेभान झालो
कळले नाही कधी
मी तिच्यात गुंतलो
जेव्हापासून तिच्या प्रेमात
मी हरवून गेलो
कळले नाही कसा
शब्दांशी खेळू लागलो
तिच्या  प्रेमरंगात
मी देहभान विसरलो
तिच्या प्रितीन पुरता
मी झपाटला गेलो
वेगवेगळ्या भावनांना
ती जन्म देते
माझ्या हातून सार
ती लिहून घेते
माझी कविता म्हणजे
तिचा न माझा संवाद असतो
मी फक्त तिच्यावर
वेड्यासारखं प्रेम करतो
कवी नाही मी
हे माझं प्रेम आहे
चार दोन कविता करून
प्रेम थोडच थांबणार आहे
माझं प्रेम जगावेगळ
ते कधीच मिटणार नाही
हे जग सोडेपर्यंत
हि भावना मनातून जाणार नाही .Marathi Kavita : मराठी कविता


Critic

  • Guest
Re: हे माझं प्रेम आहे
« Reply #1 on: September 10, 2012, 03:03:46 PM »
Good one! Keep improving.

d p mahale

  • Guest
Re: हे माझं प्रेम आहे
« Reply #2 on: September 12, 2012, 05:13:35 PM »
 :(mazi preyasi mala sodun geli.

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
Re: हे माझं प्रेम आहे
« Reply #3 on: September 14, 2012, 09:58:02 PM »
thanks