Author Topic: गुंफतो मी गजरा ...  (Read 1161 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
गुंफतो मी गजरा ...
« on: September 19, 2012, 12:19:36 AM »

ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा
 http://ravindrabendre.blogspot.com/2012/09/blog-post_18.html

गुंफतो मी गजरा ...

सखीच्या आठवणींचा गुंफतो मी गजरा
नाही बोललो तरी  बोलतात नजरा ।
टप्पोरे नेत्र तिचे  लाविती ओढ मना
वाटे टेकावे ओंठ  अन चुंबावे तयांना ।
रोखलेले कोपाने  पाहतां तेंच नेत्र
विचार चुंबण्याचा मनीच राहतो मात्र ।
ओंठ नाजुक तिचे  पाहता तोच विचार
दूर होऊन नेत्रांवरून  घसरतो ओंठावर ।
रोवूनि दांत ओंठी  निषेधते सखी जेव्हां
दूरावतो मनामधून चुंबनाचा विचार तेव्हां ।
वाटे करावा स्पर्श  काळ्याभोर केसांना
कसे करुं ते आतां  भासच फक्त असताना ।
असा भास वेळीअवेळी मनामध्ये होत असतो
म्हणून वेळोवेळी मी सारखा-सारखा फसत असतो  ।।

रविंद्र बेंद्रे
« Last Edit: September 19, 2012, 12:32:28 AM by Sadhanaa »

Marathi Kavita : मराठी कविता