Author Topic: परि सखीस भेटण्याला...  (Read 854 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
परि सखीस भेटण्याला...
« on: September 20, 2012, 10:28:05 PM »
.
ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा ..Please Click on this.
http://ravindrabendre.blogspot.com/2012/09/blog-post_20.html


                     परि सखीस भेटण्याला...

घंटा-पळे अन दिवसांनी  काळ पुढे चालला आहे
पळत्या क्षणां बरोबरच आयु कमी होत आहे ।
जीवनाची विचित्र गति  स्मृतीं मध्ये विसावते आहे
आठवणींचा हार परंतु  पटापट गुंफला जात आहे ।
सखी सहवासाच्या स्मृतीने  प्रत्येक दिवस उगवतो आहे
रंगुनि त्या आभासांत हरएक दिन मावळतो आहे ।
जीवनांत सुख मिळताना  मोद फारसा नसे मनांत
कवटाळता आठवणींना मात्र हर्ष होतसे आभासांत ।
जीवनाचे सत्य विचित्र  कळत ना कळावे तेव्हां
आस मनाला लागते  अन क्षण निघुनि जाई तेव्हां ।
मुकलो आतां सखीस अन  तिच्या प्रेमळ सहवासाला
म्हणुन अंधाऱ्या जीवनांत  आठवणींना बहर आला ।
स्थिरावते मन स्मृति मध्ये  त्यांत अन रंगुनि बसतो
परि सखीस भेटण्याला काळ दिनादिनाने पुढे धांवतो  ।।

 रविंद्र बेंद्रे

Marathi Kavita : मराठी कविता

परि सखीस भेटण्याला...
« on: September 20, 2012, 10:28:05 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दोन अधिक पाच किती ? (answer in English number):