Author Topic: आठवण  (Read 2488 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
आठवण
« on: September 25, 2012, 08:26:38 PM »
   आठवण                     ::)

 का मलाच तुझी
 इतकी आठवण येते                                 
 माझी सारी रात्र
 तुझ्या आठवणीत सरते
 प्रत्येक क्षण तुला
 मन घेऊन फिरते
 तुझे नाव ओठांवर
 नेहमी माझ्या रुळते
 स्वप्नातही तुझी आठवण
 मला गं छळते
 बंद पापण्या असतांनाही
 मन तुलाच बघते
 रोज रात्री निजतांना
 उचकी गं लागते
 तुलाही येते आठवण
 तेव्हा मज कळते
 प्रेमात पडल्यावर सखे
 असेच गं घडते
 हे मन बावरे होऊन
 आठवणींच्या झुल्यावर झुलते.
 संजय एम निकुंभ
 दि. २४.९.१२ वेळ: रा. ११ वा.
 

Marathi Kavita : मराठी कविता