Author Topic: दूर अशी जातांना...  (Read 1977 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
दूर अशी जातांना...
« on: September 25, 2012, 09:54:54 PM »
.
ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .
Please Click on this
http://ravindrabendre.blogspot.com/2012/09/blog-post_25.html

दूर अशी जातांना  …

दूर अशी जातांना  वळून मागें पाहू नको
जीवनाच्या गोड स्मृति  संगे मात्र नेऊ नको ।
त्या स्मृतींच्या आधारे  जीवन हें जगवायचे
आठवणींत गुंगून त्या  विरहदुःख विसरायचे ।
जीवनांतले स्मृति पापूद्रे  रोज रोज निघतात
तुझ्या अभावे झालेल्या  जखमा वहात रहातात ।
जीवनांतून दूर जाऊनि स्वप्नांमध्ये रोज येशी
मनांमधली स्मृतिदुःखे रोज रोज ती चाळविशी ।
अपुरें जें स्वप्न राहिले  देशी येऊनि कां स्वप्नांत
सुखाचा तो क्षण एकच  देशी दुःख सागरांत ।
मम सुखाची होती इतुकी  काळजी तुझ्या मनांत
कां गेलीस सोडून  मजला एकाकी विरहांत ।
माझ्या साठी इतुके तूं  कष्ट हें घेउं नको
अनंतातून अशी रोज माझ्या स्वप्नीं येउं नको ।
जवळीक तुझी नको मला  असें मात्र समजूं  नको
वेड्या या प्रीतिसाठी  अधांतरी  तूं राहूं नको
               रविंद्र बेन्द्रे

Marathi Kavita : मराठी कविता