Author Topic: क्षणा क्षणानें काळ धांवते..  (Read 1310 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311


क्षणा क्षणानें  काळ धांवते..

क्षणा क्षणानें काळ धांवतो                                   
मिलनास्तव मी आतूर होते
काळ विरहाचा कधी संपतो
त्याचीच मी वाट पहाते ।
विरहाचा क्षण अनंत असतो
काळ जणुं तेथेच थांबतो 
ओढ मनाची अन वाढवतो 
वाट बघुन मग थकून जातो ।
उदभवती ज्या मनीं भावना
एकेक ती मी टिपून  घेते
अस्थिर मन झाले असता 
भावना माझ्या मीच बघता ।
कां नसावी सख्यास कल्पना 
विरहांत मी झुरत बसते
स्मृतीत त्याच्या सहवासाच्या 
मी स्वतःस विसरून जाते ।     
विसरून मी स्वतःस जाते 
मनांत दाट अंधार दाटतो
मीलनाचा किरण परि तो
अंधारांत मज अंधूक दिसतो ।
भेटेल सखा हा विचार मनीं 
कुठून तरी तो डोकावतो
कल्पनेनं रम्य अशा त्या
मी मनांत मोहरुन जाते ।
मुंगीच्या हळूं पावलापरि
न कळतसा काळ धांवतो
थबकला हा आज असा कां
मनात माझ्या प्रश्न येतो ।
क्षणा क्षणांन काळ धांवते
परी मला तो स्तब्ध वाटते 
सरकेल केव्हां पुढें कधीं तो
त्याचीच मनीं वाट बघते । ।
।        रविंद्र बेंद्रे

   
« Last Edit: September 27, 2012, 11:36:03 AM by MK ADMIN »