Author Topic: चांदण्यांचे हात तुझे  (Read 2314 times)

Offline SANJAY M NIKUMBH

 • Full Member
 • ***
 • Posts: 502
चांदण्यांचे हात तुझे
« on: September 29, 2012, 09:54:12 PM »
चांदण्यांचे हात तुझे

 चांदण्यांचे हात तुझे
 ओंजळ तुझी फुलांची
 साथ असे मज प्रिये
 निरंतर तुझ्या प्रेमाची
 भुरळ मला पडे
 तुझ्या मोगऱ्याच्या वेणीची
 गुंतून राही मन
 जादू तुझ्या अंबाड्याची
 खळी गं वेड लावी
 तुझ्या गोऱ्या गालाची
 नाजूक मुलायम काया
 जणू तुझी रेशमाची
 उरांत भरून वाहे
 गंगा तुझ्या सुगंधाची
 या अंधारलेल्या मनास
 साथ तुझ्या ज्योतीची
 हि आस कशी सदा
 मनी तुझ्या ओढीची
 नसानसात आग सखे
 फक्त तुझ्या मिलनाची
 चांदण्यांचे हात तुझे
 ओंजळ तुझी फुलांची
 साथ असे मज प्रिये
 निरंतर तुझ्या सावलीची .
 संजय एम निकुंभ , वसई
 दि. २६.९.१२ वेळ : १०.१५ रा.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: चांदण्यांचे हात तुझे
« Reply #1 on: October 01, 2012, 11:07:48 AM »
sundra....

Offline SANJAY M NIKUMBH

 • Full Member
 • ***
 • Posts: 502
Re: चांदण्यांचे हात तुझे
« Reply #2 on: October 05, 2012, 06:44:50 PM »
thanks