Author Topic: नयन मनोहर असे...  (Read 1247 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
नयन मनोहर असे...
« on: October 02, 2012, 11:39:43 PM »

नयन मनोहर असे.....
नयन मनोहर असे  सजवीन प्रीत मंदीराला
लागली होती आस ही  सदैव माझ्या मनाला ।
जतन केल्या नवनवीन कल्पना अंतरांत
प्रीतिने करुं जीवन म्हंटले सुखासीन ह्या जगांत ।
भावनांचा मेळ कधीं  बसत ना व्यवहारांत
विचार न ह्याचा केला अन रंगुनि गेलो स्वप्नांत ।
प्रीत केली सखीवर  तन-मन सारे विसरोनी
सुखी तिला करण्याचा  विचार एकच हा मनीं ।
वाटे मिळाले ह्याच जगीं सुख असे जें स्वर्गांत
उल्लंघिले सहजतेने  दिसती अडथळे मार्गांत ।
हाय परि झाली नव्हती ओळख स्त्रीच्या हृदयाची
काय किंमत तिच्याजवळी उत्कट अबोल प्रेमाची ।
बोलल्या विना कां  स्त्रीस तें कळत नाहीं
भावना-स्पर्शात तिला  प्रेम समजून येत नाहीं ।
गुपित हे स्त्री मनाचे नव्हते मजला कळले
म्हणुन अबोल राहून  तिजवर मी प्रेम केले ।
मनांतील राक्षसाने अखेर तिचा बळी घेतला
अन माझ्या जीवनांतील  घास सुखाचा उचलला ।
निमूट ती सोडून गेली  माझा तो धरला हात 
म्हणुनि आतां उरले तें  शल्य एकच मन्मनांत ।।
रविंद्र बेंन्द्रे
ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .
Please Click on this
[/color]]http://ravindrabendre.blogspot.com/2012/10/blog-post_2.html

Marathi Kavita : मराठी कविता

नयन मनोहर असे...
« on: October 02, 2012, 11:39:43 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

raj kundekar

  • Guest
Re: नयन मनोहर असे...
« Reply #1 on: October 03, 2012, 04:07:21 PM »
 :)maz prem...................

raj kundekar

  • Guest
Re: नयन मनोहर असे...
« Reply #2 on: October 03, 2012, 04:08:30 PM »
maz prem..................

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
पाच अधिक नाऊ अधिक शून्यं  किती ? (answer in English number):