Author Topic: हेचं आपलं प्रेम  (Read 3570 times)

Offline SANJAY M NIKUMBH

 • Full Member
 • ***
 • Posts: 502
हेचं आपलं प्रेम
« on: October 04, 2012, 12:59:18 PM »


कशाला हे मन
कुणाच्या प्रेमात पडतं
तू प्रेमात पडलास
आपल्याला का सांगत

कशाला कुणाच्या आठवणीन
रात्र रात्र जागत
कुणी भेटलं नाही
तर अश्रू का गाळत

कशाला कुणाला भेटायला
मन इतकं तडफडत
भेटून गेल्यावरही
भेटीसाठी का तळमळत

कशाला कुणासाठी मन
क्षण क्षण झुरत
रात्रंदिवस विचार करून
या जीवाला छळत   

कां इतकं कुणी
मनास आवडून जात 
रंगेबिरंगी स्वप्नांना
मनात पेरून जात

हे माझं प्रेम
मनाला कसं  कळत
कां आतला आवाज  ऐकून
मन वेड होत 
 
काही कां असे नां
काहीतरी असं घडतं 
हेचं आपलं प्रेम
आपल्याला कळून जात .
                                       संजय एम निकुंभ , वसई
                                      दि.४.१०.१२ वेळ : १२.३० दु.
 

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Tushar Kher

 • Jr. Member
 • **
 • Posts: 78
 • Gender: Male
  • हिन्दी रचनाएँ
Re: हेचं आपलं प्रेम
« Reply #1 on: October 06, 2012, 10:29:11 PM »
छान आहे कविता!

Offline SANJAY M NIKUMBH

 • Full Member
 • ***
 • Posts: 502
Re: हेचं आपलं प्रेम
« Reply #2 on: October 08, 2012, 06:58:45 PM »
thanks