Author Topic: प्रेम म्हणजे ...  (Read 2420 times)

Offline Er shailesh shael

  • Jr. Member
  • **
  • Posts: 77
  • Gender: Male
प्रेम म्हणजे ...
« on: October 04, 2012, 07:37:05 PM »
प्रेम म्हणजे ...

प्रेम म्हणजे एक कविता कधीही न संपणारी,
प्रेम म्हणजे 'ती' त्या कवितेतलं माझं अस्तित्व जपणारी ..

प्रेम म्हणजे एक गालिचा पहिल्या पावासतल्या गारांचा
प्रेम म्हणजे एक सोहळा रिमझिमत्या धारांचा

प्रेम म्हणजे ते भांडण कधी हि न संपलेले
प्रेम म्हणजे त्या भांडणातले तुझे आसू माझ्या ओंजळीत लपलेले

प्रेम म्हणजे तुझा पहिला स्पर्श थरथरलेला
प्रेम म्हणजे त्या स्पर्शातला माझा जीव काहुरलेला

प्रेम म्हणजे तुझा आभास ,तुझी चाहूल
प्रेम म्हणजे पुस्तकात जपून ठेवलेले ते सुकलेले फूल

प्रेम म्हणजे ...

प्रेम म्हणजे एक खेळ जो मधेच सोडता येत नाही..
एकदा का डाव मांडला की परत मोड़ता येत नाही ....
                                                                                          ---Shailesh Shael

Marathi Kavita : मराठी कविता