Author Topic: जेव्हाही पाहतो तुझ्याकडे  (Read 2463 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
जेव्हाही पाहतो तुझ्याकडे
तू माझी आहेस म्हणून
आनंदाचे तुषार उठतात
माझ्या तन-मनातून
तुझा चेहरा दिसतो
पहाटेच्या दवबिन्दुतून
तुझा स्पर्श होतो
सकाळच्या कोवळ्या किरणातून
तुला हसतांना पाहतो
प्रत्येक फुलांफुलांतून
तू डोकावतेस
झाडाच्या पाना-पानातून 
तूच दिसतेस मला
पावसाच्या सरींतून
तू भेटतेस मला
कडाडणाऱ्या विजेतून
तू जाणवतेस मला
चालतांना वाटेतून
तुला वाहतांना पाहतो
माझ्या नसानसातून
तुझा गंध येतो
माझ्या श्वासाश्वासातून
गाढ झोपेतही भेटतेस
तू मला स्वनांतून
जेव्हापासून पाहिलं तुझ्याकडे
तू माझी आहेस म्हणून
तुझी सोबत जाणवते
प्रत्येक क्षणी जगण्यातून .
 
                                           संजय एम  निकुंभ ,वसई
                                         दि. ४.१०.१२ वेळ : ८.०० रा.