Author Topic: माझ्या प्रेमळ हृदया..  (Read 1709 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
माझ्या प्रेमळ हृदया..
« on: October 07, 2012, 03:59:56 AM »

ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .
Please Click on this
http://ravindrabendre.blogspot.com/2012/10/blog-post_6.html

माझ्या प्रेमळ हृदया..

माझ्या प्रेमळ हृदया
          दे मज घोंट प्रीतिचा
धुंद होऊनि जगू दे
        क्षण केवळ एक सुखाचा ।
दिन अनेक स्वप्न पाहिले
त्यांतचि सदा रंगुनि गेले
        कंठू काळ कसा विरहाचा ।
नयन असती तहानलेले
स्पर्शास्तव अणूं कायेतले
        वेध घेती सखी मिलनाचा ।
झडकरी येऊनि मला
विरंगुळा दे मज जीवाला
         होऊन साथी मम  जीवाचा ।।
रविंद्र बेंद्रे
« Last Edit: October 07, 2012, 04:00:22 AM by Sadhanaa »

Marathi Kavita : मराठी कविता