Author Topic: सांग सख्ये माझी होशील कधी  (Read 1595 times)

Offline Somnath pisal

  • Newbie
  • *
  • Posts: 16
सांग सख्ये गुलाबासारखी जीवनात येशील कधी
काट्याप्रमाणे टोचत राहशील कधी
सांग सख्ये साखरेची गोडी
पण मधुमेहाची भीती देशील कधी
सांग सख्ये दिव्यासारखं जळत राहून
माझ्या जीवनात प्रकाश देशील कधी
सांग सख्ये पहाटेच्या स्वप्नात परी होवून
तुझं जग दाखवशील कधी 
सांग सख्ये वाय्राची मंद झुळूक होवून
स्पर्श करशील कधी
सांग सख्ये या तहानलेल्या अश्वाला
पाणी पाजशील कधी
सांग सख्ये माझी होशील कधी