Author Topic: गंध तुझ्या हसण्याचा  (Read 3919 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
गंध तुझ्या हसण्याचा
« on: October 28, 2012, 02:53:31 PM »
गंध तुझ्या हसण्याचा

तुझ्या हसण्याचा गंध
रोमारोमात भिनतो
तो गंध प्रिये
मला तुझ्याकडे खेचतो
तुझ्या हसण्याच चांदण
मी ओंजळीत भरतो
त्या चांदण्यात हरवून
बेभान मी होतो
तू हसतांना प्राजक्त
हळू हळू सांडतो
त्या एकेक पाकळ्या
मी वेचून घेतो
तुझ्या हसण्याचा सूर
मज वेड लावतो
तू नसतांना कानी
तो गुंजन करतो
तुझं हसणं प्रिये
तुझा चेहरा खुलवतो
मला प्रीतीच्या झुल्यावर
नेवून झुलवतो
तुझ्या हसण्याचा आवाज
मनी प्रीत फुलवतो
तुला कसं सांगू प्रिये
मी या जगास विसरतो
तुझ्या हसण्याचा गंध
माझी सोबत करतो
म्हणून तर बेधुंद
मी जगू शकतो .

संजय एम निकुंभ , वसई
दि. २७.१०.१२ दु. १.३० {बँकेत }

Marathi Kavita : मराठी कविता


ram devar

  • Guest
Re: गंध तुझ्या हसण्याचा
« Reply #1 on: November 04, 2012, 07:10:12 PM »
 :) ;) :-X
i love it awsome sanjay kavi ,laghe raho sanjay bhai

Offline मिलिंद कुंभारे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,417
  • Gender: Male
  • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: गंध तुझ्या हसण्याचा
« Reply #2 on: April 30, 2013, 03:27:46 PM »
तुला कसं सांगू प्रिये
मी या जगास विसरतो
तुझ्या हसण्याचा गंध
माझी सोबत करतो
म्हणून तर बेधुंद
मी जगू शकतो


छान कविता आहे :) :) :)