Author Topic: अन तुझाच मध्ये वाहत गेलो.....  (Read 1846 times)

Offline Mandar Bapat

  • Jr. Member
  • **
  • Posts: 263
  • Gender: Male
तुलाच आपली मानत गेलो
 अन तुझाच मध्ये वाहत गेलो.....

माझ्यातच धुंद मी रमलेलो
विचारांचा गर्दीत एकटाच जमलेलो ,
मोहक हास्यात गुरफटलो मी 
बाहेर  निघायचा राहून  गेलो  ,
तुझा गोडीतच  विरघळत  गेलो 
अन तुझाच मध्ये वाहत गेलो......


काळेभोर  तूझे  ते मादक डोळे
इशाऱ्यात  ते सारेच  बोले,   
जवळ येता ते गप्प अबोल
जणू मदिराच  ते पाजत गेले,
तुझा डोळ्यातच हरवत गेलो     
अन तुझाच मध्ये वाहत गेलो........

 केस मखमली काळे लांब
मज अडवे म्हणे थोडे थांब,
स्पर्शली तुझी गालाला  लट ती
मज  अवघड झाले थांबणे लांब ,
तुझा केसातच  अडकत गेलो   
अन तुझाच मध्ये वाहत गेलो........   
 
ओठ तुझे ते मधाचा प्याला
मुंगी  सवे जीव   झाला,
सुंदर गुलाबी गोड लाली ती     
चाखण्याचा मोह न आवरे मला,
 तुझा ओठातच  मी  रमत गेलो 
अन तुझाच मध्ये वाहत गेलो.....   


तुझी अशी हि मृगाप्रमाणे  कांत
आता कसलीहि  नाही भ्रांत,
तुझे अप्रतिम लावण्य असे
मी नाही माझात असा निवांत,
तुझा कांतीतच मी सारे विस्मरत गेलो
अन तुझाच मध्ये वाहत गेलो.........

तुलाच आपली मानत गेलो
 अन तुझाच मध्ये वाहत गेलो.....
   

                                                      ------- मंदार बापट