Author Topic: माझे प्रेम Timepass नाही...!!  (Read 4106 times)

माझे प्रेम Timepass नाही...!!
« on: January 09, 2014, 07:12:56 PM »
तुच आहेस जीवन माझे,
तुझ्याशिवाय कुणीच,
" माझं खास नाही.....
* * * * * * * * * * * * *
तुच आहेस स्वप्न माझे,
तुझ्याशिवाय कुणाचेच,
" मला भास नाही.....
* * * * * * * * * * * * *
तुच आहेस आयुष्य माझे,
तुझ्याशिवाय कुणाचीच,
" मला आस नाही....
* * * * * * * * * * * * *
जेवढे जाणतो मी तुला,
तुझ्याशिवाय कुणाशीच,
" माझी ओळख नाही.....
* * * * * * * * * * * * *
जेवढा तुझ्यावर आहे,
तेवढा कुणावर,
" माझा विश्वास नाही.....
* * * * * * * * * * * * *
तुलाच गातो तुलाच गुणगुणतो,
तुझ्याशिवाय कुणाला,
" मी शब्दात गुंफत नाही.....
* * * * * * * * * * * * *
तुलाच आठवत असतो मी,
तुझ्याशिवाय कुणाचीच,
" मला गरज नाही.....
* * * * * * * * * * * * *
कारण ?????
* * * * * * * * * * * * *
खरे प्रेम करतो मी तुझ्यावर,
माझे प्रेम Timepass नाही.....
Timepass नाही.....
[<3]  :-*  [<3]  :-*  [<3]

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक ०९-०१-२०१४...
सांयकाळी ०६,४१...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता