का खेळते नशीब माझ्याशी , का उरले नाते अजूनही तुझ्याशी
बंध केव्हाच तुटून गेले, तुटलेल्या धाग्यात मी गुरफटून राहिले
आसवे फक्त माझ्यासाठी, हे माझे जगणे कुणासाठी
घरटे माझे उध्वस्त झाले कि मी घरट्या बाहेर उध्वस्त झाले?
घरट्यातल्या पिल्लांसाठी मन अजूनही आक्रंदत असते
पण पिल्लांना माझी आठवण नाही मला मन पटवत असते.
आयुष्य्च्या ह्या वळणावर मी एकटीच उभी आहे,
भाविशातला हा अंधार सोबत मला करणार आहे
तुझी हाक कानी पडली हे सत्य आहे कि आभास आहे?
कारण ह्या मनाला फक्त भासच जगवत आहे
तुझ्या माझ्यातली दरी खोल खोल उतरत गेली
मी तुला मारलेली हाक हवेतच विरून गेली