Author Topic: Valentine Day..  (Read 828 times)

Valentine Day..
« on: April 13, 2012, 12:34:00 PM »
आज पुन्हा तो दिवस येणार
तोच तो दिवस होता '' valentine day'' चा
आज पुन्हा तुझी आठवण येणार
अश्रू डोळ्यात दाटून येणार
पण तू समोर नसणार
मन हि तुझीच वाट पाहणार
हो पुन्हा तो दिवस येणार ....
तोच तो गुलाब हि स्पर्शास तुझ्या असुसणार
एकांतात मज काटे त्याचे तो टोचणार
वेदना तरी किती मी सोसणार
श्वासां मध्ये तर आहेच
पण ....
तू आज अश्रू रुपी भेटणार
आज तो दिवस पुन्हा येणार ....
तो स्पर्श आज मज पुन्हा पुकारणार
मी हि मग जवळ येऊन सामोरी जाणार
पण .....
आज तो हि भास बनवून मज छळावा ?
जखमाच जखमा मलाच का मिळाव्या
त्यास मुके पणी मी का कुरवाळाव्या
त्यात दोष तरी कुठे तुझा होता
आवड होती तुला त्या अलंकारांची
पण .....
मी घेत होतो काळजी तू दिलेल्या गुलाबाची
होतो मी फकीर तुज समोर
प्रेमाची एक झोपडी मी बांधत होतो
पण ....
तुला तर मनोरे हवी होती
आहे ग मी गरीब आज देऊ न शकलो काही
प्रेमाच्या झोपडीत राहून स्वप्न फक्त तुझेच पाही
कोलमडले ते घर क्षणात तू जाताच
तो हात आता कधी मिळणार नव्हता
तुझा साथ मला आता मिळणार नव्हता
तू दिलेल्या वेदनांना आता जपणे आहे मला
प्रेम प्रेम आणि प्रेमानेच घात केला मला ...
पण आज पुन्हा तो दिवस येणार
"valentine day " म्हणून अश्रूसंगे साजरे मी करणार ....
-
© प्रशांत शिदे

Marathi Kavita : मराठी कविता