Author Topic: जुळून येती रेशीमगाठी  (Read 6767 times)

Offline MK ADMIN

  • Administrator
  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,514
  • Gender: Male
  • MK Admin
    • marathi kavita
जुळून येती रेशीमगाठी
« on: December 22, 2013, 03:49:23 PM »
Julun Yeti Reshimgathi lyrics..Music - Nilesh Moharir
Lyrics - Ashwini Shende
Singers - Swapnil Bandodkar, Nihira Joshi
Serial - Julun Yeti Reshimgathi - जुळून येती रेशीमगाठी


ती - मुक्याने बोलले गीत ते जाहले
तो - स्वप्न साकारले पहाटे पाहिले
ती - नाव नात्याला काय नवे ?
तो - वेगळे मांडले सोहळे तुजसाठी
मिळावे तुझे तुला आस ही ओठी
ती - कोणी कुठे बांधल्या रेशीमगाठी
दोघे - जुळून येती रेशीमगाठी
आपुल्या रेशीमगाठी


ती - उन्हाचे चांदणे उंबर्यात सांडले
तो - डाव सोनेरी सुखाचे कुणी मांडले
ती - खेळ हा कालचा आज कोण जिंकले
तो - हरवले कवडसे मिळून ते शोधले
ती - एकमेकांना काय हवे
तो - जे हवे सगळेच आणले तुजसाठी
कळावे तुझे तुला मी तुझ्यासाठी
ती - कोणी कुठे बांधल्या रेशीमगाठी
दोघे - जुळून येती रेशीमगाठी
आपुल्या रेशीमगाठी

Marathi Kavita : मराठी कविता