आयुष्याचे हे चक्र चालते साद घालते आशा
स्वप्नामागून सत्य धावते ही दैवाची रेषा
जन्मापासून कोण खेळवी तुलाच नाही ठावे
हवेहवेची हाव सरेना किती हिंडशी गावे
ऐक सुखाचा मार्ग मानसा सोड सोड अभिलाषा
अभिलाषा..... अभिलाषा .....
गीत -
संगीत - अशोक पत्की
स्वर - आरती अंकलीकर-टिकेकर, ज्ञानेश्वर मेश्राम
(शीर्षक गीत, मालिका: अभिलाषा, वाहिनी: झी मराठी)