मन डोह खोल खोल एक अलवार ओल
कुणासाठी वेडावलं अन् चुकलं पाऊल
मन डोह खोल खोल
मन सावली स्वत:ची कशी घुटमळे पायी
मन पाखरू उंच आभाळात जाई
आभाळात जाई
कधी आतला संवाद कधी वेड पसा-याचे
कुणा उमगत नाही मन उधाण वा-याचे
गीत - अश्विनी शेंडे
संगीत - अभिजीत पेंढरकर, सुयोग चुरी
स्वर - अक्षता सावंत
(शीर्षक गीत, मालिका: मन उधाण वा-याचे, वाहिनी: स्टार प्रवाह)