दिला नियतीने स्त्री जन्माला विपरीतसा हा शाप जुना
ठायी ठायी दैत्यपणाची प्रचिती येई पुन्हा पुन्हा
स्त्रीच्या भाळी सदाच लिहिले जहर तेच कडु चार
पचवून त्याला अमृत उधळी तीच माय हळुवार
माणसातल्या देवपणाचा होतो तेव्हा साक्षात्कार
हाती येते नवनीत जेव्हा मंथन होते अपरंपार
गीत - मंगेश कुळकर्णी
संगीत - अशोक पत्की
स्वर - देवकी पंडीत
(शीर्षक गीत, मालिका: मंथन, वाहिनी: ई टीव्ही)