सोनियाच्या उंब-यात प्रकाशाची उधळण
तुम्हासाठी घेऊन आलो काळजाचं निरुपण
सूर्यदेव आभाळात पाखरांची किलबील
पाणवठे जागे झाले काकणांची किणकिण
मानसाच्या जिंदगीची गाथा बाई ग
सोनियाचा उंबरा ही कथा गाई ग
ऐका कथा सांगतो पुण्यवान ओसरीची
समाधानी वेळू मध्ये वाजलेल्या बासरीची
नात्यासंगे हलणा-या हिरव्याकंच तोरणाची
तापलेल्या अंगणात पोळलेल्या पावलांची
मानसाच्या जिंदगीची गाथा बाई ग
सोनियाचा उंबरा ही कथा गाई ग
गीत - दासू वैद्य
संगीत - अशोक पत्की
स्वर - माधुरी करमरकर, स्वप्नील बांदोडकर
(शीर्षक गीत, मालिका: सोनियाचा उंबरा, वाहिनी: ई टीव्ही)