Author Topic: खरच हे प्रेम आहे कि वासना...!!  (Read 2602 times)

माझ्याशी नेहमी भांडते,
मला रोज खुप छळते ती.....

कधी माझ्यावर खुप हसते,
कधी माझ्या सोबत रडते ती.....

नेहमी दूर जाण्याचा प्रयत्न करतो मी,
तर अजूनच माझ्या जवळ येते ती.....

कधी कधी खूप रागवतो तिच्यावर,
तर हळूच मला मिठीत घेते ती.....

राहून राहून खुप अंगचटीला येते,
प्रत्येक वेळी आपली मर्यादा ओलांडते ती.....

बेभान होऊन जेव्हा तिच्यात एकरूप होतो,
तर नेहमी माझ्या ओठांना चावते ती.....

नको व्हायला तर तेच घडते,
सर्व काही झाल्यावर रडते ती.....

खरच हे प्रेम आहे कि वासना,
नेहमी याच विचारात पडतो मी.....
 :o      :(      :o

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक ०८-१२-२०१३...
दुपारी ०२,०२ ...
© सुरेश सोनावणे.....