Author Topic: या कातर वेळी...!!  (Read 1886 times)

या कातर वेळी...!!
« on: December 20, 2013, 07:38:25 PM »
या कातर वेळी,
पाहीजेस तु जवळी.....

मी समोर येता तुझिया,
पडावी गालावर खळी.....

एकटक पाहताच तु मजला,
खुलावी तुझिया चेह-याची कळी.....

करुनी सुखाची बरसात मजवर,
दु:खातून रिती व्हावी झोळी.....

मिठीत कवटाळून तुझिया,
प्रेम रंगाची साजरी करूया होळी.....

तोडूनी तू आज बंध सारे,
खेळावी मज सोबत प्रेमाची खेळी.....
♥ * ♥ * ♥ * ♥ * ♥ * ♥

_____/)___/)______./­­¯”"”/­­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­­\)

स्वलिखित -
दिनांक २०-१२-२०१३...
सायंकाळी ०७,३३...
© सुरेश सोनावणे.....

               
 
« Last Edit: December 30, 2013, 09:03:51 PM by सुरेश अंबादास सोनावणे..... »

Marathi Kavita : मराठी कविता