Author Topic: “कुर्त्याचं बटन तुटलं”....!!© चारुदत्त अघोर  (Read 3278 times)

Offline charudutta_090

  • Jr. Member
  • **
  • Posts: 185
  • Gender: Male
  • A fall leaf of autumn,....!!
ॐ साईं.
“कुर्त्याचं बटन तुटलं”....!!© चारुदत्त अघोर,(६/७/११)
त्या दिवशी आभाळ जरा जास्तच गडगडत होतं,
कारण झाकोळ सर्वत्र असल्यानी,कुठे ऊनच नव्हतं;
माझं काहुरीत चित्त खोलीच्या खिडकी बाहेर,आकाशी स्थिरलं होतं,
कारण,बहुतेक पावसाचं येणं, आभाळ वळून फिरलं होतं;
खूप थंड हवा सुटून, वादळ सख्याला संगवत होती,
ती हि जशी अति वृष्टी व्हायाकरिता,मन रंगवत होती,
मी थंडी पायी, घातल्या कुर्त्यावर, शाल घेऊन बसलो,
त्या शहारीत काट्यांनी,जसा अंगी आक्रसून कसलो;
खरोखरीच आकाशी गर्जून, एक वीज कडाडून चमकली,
माझी दृष्टी आभाळी,स्थिर होऊन,नवलायीत हबकली;
नकळत खिडकीतच बसून कधी डोळा लागला,कळलंच नाही,
कधीच न पाहिलेलं जग,आज कसं दिसलं,हे वळलंच नाही;
मी भिंती टेकला असता,दोन कंगणित हाथ,जवळून मला वेढावले,
माझं केस लाटांबर कुरवाळत,जवळत कुशी पुढावले;
त्या एकाच शालीत ती आणि मी,श्वास टाकी उसावलो,
सहजच घसरून,मी तिच्या उबदार मांडीत,कुसावलो;
त्या एका शाली कळलंच नाही, कधी तिने त्वचावले,
सगळे वस्त्र विखुरीत झाले,जे होते गारव्यात बचावले,
पाऊसाचा वेग तीव्रावत होतां,जसं कोणी त्यास पछडलं,
तिने सर्व मला कामी कार्यवून,हाथ स्तनी बछडलं;
ते क्षण न संपण्या करिता,ओल्या रसनेस तरसले,
नव तारुण्याची साक्ष देत, अनोळखी थेंब, पहिल्यांदी पांघरूणी बरसले;
तिच्या घट्ट मिठीतून,सावरत मी स्वतःस,येत्या भानी सोडले,
तिनं तृप्तीत हसून,मला घातल्या कुर्ती, अधिकच ओढले;
त्या आगळ्याच ओल्याव्यानी,दचकून उठत,होतं स्वतःस,… सर्वांगी लुटलं,
आरशी बघत शहारलो,तिनं ओढल्या कापडी,खरंच….. कुर्त्याचं बटन तुटलं....!!
चारुदत्त अघोर,(६/७/११)


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
दहा वजा दहा किती ?  (answer in English):