मीलनाचे ... !
उघडावे दार
नयनांच्या पार
सोबती अपार
मीलनाचे ... !
स्पर्शाला भिवुन
लाजते वळून
मिठीत गोडवे
मीलनाचे ... !
कशाचेही नसे
देहभान पिसे
तळहाती स्पर्श
मीलनाचे ... !
लागेल चाहुल
बासरीची हूल
तुझ्या ओठी फुल
मीलनाचे ... !
असेल नसेल
रातही फसेल
स्पर्श आता झेल
मीलनाचे ... !
व्योमास कळेल
अशी घालमेल
गाणेही लाजेल
मीलनाचे ... !
वर्षा पाटील
१५ फेब्रुवारी२००९