Author Topic: "स्वप्नं"..... ©चारुदत्त अघोर  (Read 2495 times)

Offline charudutta_090

  • Jr. Member
  • **
  • Posts: 185
  • Gender: Male
  • A fall leaf of autumn,....!!
ॐ साईं.
"स्वप्नं"..... ©चारुदत्त अघोर
गंध गंधित माझे स्वप्नं,मोगर्याच्या गजऱ्या परी,
दवीत ओले ते क्षण,पहिल्या सरी पावसा परी;
उंच उडी मी आभाळी,कधी पर्वती,कधी खोल दरी,
कायम ठोके चूकवी आत,धडधड वाजती या उरी;
दूर दूर ते नगर,हिरवळ भोवती वाहती झरी,
चिमुकले ते गाव असे,नसे आधुनिक हवा जरी;
गोड ते सखे सोयरे,प्रेम वसे घरोघरी,
ओलावा असे नसनसात,माणुसकीच्या परोपरी;
बाला लावण्य ओथंबल्या,लाज पदर झाकून जरी,
स्मित लपवून ओठी,पळती वाजवून पैंजण तरी;
रसाळ तरुण्यीत ताठीत तरुण,पुरुष बाणा दिसे खरी,
घायाळ होती लज्जित तरुणी,धसे त्याची नजर सुरी;
भिजले तारुण्य वाहे अंगी,भेटी दोघे तळ-काठा वरी,
तुडूंब भावना उत्तुंग स्वप्ने,पाहती नयन ते भाव भरी;
एक आगळे जग थाटवू,बांधून घरटे,चार करी,
काडी काडी जमवू दुनिया,म्हणती लोक आगळी खरी;
आळस देऊन उठी मी,भासे स्वप्नं होते नदी तीरी,
ओलावून गेले चिंब मजला,कुठले थेंब हे गादी वरी..!
चारुदत्त अघोर (२३/६/११)