Author Topic: "सप्रेस्ड इमोशन्स....!!" ©चारुदत्त अघोर  (Read 2062 times)

Offline charudutta_090

  • Jr. Member
  • **
  • Posts: 185
  • Gender: Male
  • A fall leaf of autumn,....!!


ॐ साईं
"सप्रेस्ड इमोशन्स....!!" ©चारुदत्त अघोर(४/५/११)

माझ्यात तुला काय आवडलं,हे तुला एका रात्री सहज विचारलं,
तुझ्या चेतनेत,जसं वारच संचारलं;
जरा गहन विचारात,तू म्हणालीस,थांब सांगते,
जरा स्वतःच्या मनात,शिरून रंगते;
तू धुंदीत बोलू लागलीस…..
पहिले तू,एक प्रियकर,जो अतीच रसिक,
नंतर तुझा पेशंस..जो शून्य-सोशिक;
दुसरी तुझी नजर,जी आर पार छेदून जाते,
माझा गगनाछादीत विश्व,भेदून जाते;
तुझी छाती,जी एक मऊ मखमली गवताचा आभास देते,
तुझी पाशित पकड जी,मुक्तीच्या निष्फळ प्रयात्नांन्चा सहवास देते;
तुझे ओठ,जे रसाळ विड्याचा वाहता रस रंगवतात,
तुझी आक्रस जीउणी,जे पिळून ओठ तंगावतात;
तूझं हास्य जे,पुरुषी सात मजलि, खळाळतं,
तूझं केशी लाटांबर,जे कपाळी ओशाळतं;
तुझी अर्धं-दाढी चे खुरट,ज्यांची शृंगारिक बोच,मला काटावते,
तुझी जबरदस्ती जी,मला पिळायला धीटावते;
तुझी स्मोकिंग स्टाइल,जी डोळे बारकवून धुरावते,
तुझी बाकदार चाल जी,मनी धडकी उरावते;
तुझा लाल नाक शेंडा,जो काना मागे रगडावतो,
तूझं विशाल पंजा,जो अंगी स्पर्शताच,चेतना भडकावतो;
तुझी शर्टाची वर उघडी दोन बटणे,जे देतात सदैव “इन्व्हिटेशन”,
तुझ्या मिठीतला डीओ-सिगारेट मिक्स वास,जो देतो नेहेमी “टेम्पटेषन”;
अझून काय सांगू रे,वेड लावणारी तुझी एक एक “मोशन”,
या सर्वाहून मला धुंद करणारं,तूझं “आफ्टर शेव लोशन”;
यावर मी म्हंटलं,अगं बस आता,किती करशील माझं शाब्दिक “प्रमोशन”?
आता मेणित रात्र पिघळू दे,कारण ‘अनकनट्रोल्ड’ झाल्यात “सप्रेस्ड इमोशन्स”....!!
चारुदत्त अघोर(४/५/११)