Author Topic: "बेभान,रसाळ,तारुण्य""...चारुदत्त अघोर  (Read 4343 times)

Offline charudutta_090

  • Jr. Member
  • **
  • Posts: 185
  • Gender: Male
  • A fall leaf of autumn,....!!
ॐ साईं.
"बेभान,रसाळ,तारुण्य""...चारुदत्त अघोर(१४/४/११).
जेव्हा मन कशालाच,भीत नाही,
मानत जे कोणतीच,रीत नाही;
सगळ्याच गोष्टी जेव्हा,वाटतात नगण्य;
तेच म्हणजे बेभान,रसाळ तारुण्य.

जेव्हां हर ऋतू,रोमांचच खडावतो,
गर्मितही काटवून,थंडी वेडावतो;
जेव्हां बगीचा वाटतं,अभय अरण्य;
तेच म्हणजे बेभान,रसाळ तारुण्य.

जेव्हां कोणत्या नवीनच,बीजाला फुटतं रोप,
आणि रात्रं जागवून,दिवसा येते झोप;
जिथे दिसतं कुरुपतेतही,रुपेरी लावण्य;
तेच म्हणजे बेभान,रसाळ तारुण्य.

जेव्हां रहावसं वाटतं,मनाशीच एकाकी,
सुकल्या त्वचेलाही,चढते लकाकी;
जेव्हां हर पापच,वाटतं मोठ पुण्य;
तेच म्हणजे बेभान,रसाळ तारुण्य.

जे हर्णावतं बागडून,पूर्व असलं पाडस,
सगळ्या स्तिथीत,जेव्हां शुरावतं धाडस;
चुकीचीच वाट वाटते,ओळख-जाण्य;
तेच म्हणजे बेभान,रसाळ तारुण्य.

जे दव असूनही भासत,पळस पांनी काच थेंब,
चंचलून निसटतं,न थाम्बता जेम तेम;
आयुष्य स्तिथीत जे,सर्वात परमाग्रगण्य;
तेच म्हणजे बेभान,रसाळ तारुण्य.

जे कितीही वाटलं तरी,जड करणं जतन,
कोणत्याही नाजूक क्षणी,उतवतं पतन; 
घडलेल्या गोड गुन्ह्यास,सदैव अजाण्य ;
तेच म्हणजे बेभान,रसाळ तारुण्य.

जेव्हां अंगी बहरतो,सुगंधून मधु मास,
एक अधर स्पर्शही,वेडावतो मिलन-आस;
अंगी हर बहरत्या,शहार्ण्याचही नाविण्य;
तेच म्हणजे बेभान,रसाळ तारुण्य.

ज्या अवस्थी निसर्गही,ओतून टाकतो सर्व रंग,
इंद्रधनुष्यी रंगून,खुलवून टाकतो टप्पोरून अंग;
सर्व जीवनावस्थेत ज्याला,सर्वगुणी प्राविण्य;
तेच म्हणजे बेभान,रसाळ तारुण्य.
चारुदत्त अघोर