Author Topic: "मनाच्या ऋतूला कधीच नसते पानगळ"...©चारुदत्त अघोर.(२९/६/११)  (Read 2135 times)

Offline charudutta_090

  • Jr. Member
  • **
  • Posts: 185
  • Gender: Male
  • A fall leaf of autumn,....!!
ॐ साईं.
"मनाच्या ऋतूला कधीच नसते पानगळ"...©चारुदत्त अघोर.(२९/६/११)
कोणत्या शब्दात व्यक्तवु,माझ्या करीता कि आहेस तू,
तुझी प्रत्येक लकब,कार्य,जणू निसर्गाचे बदलते ऋतू;
तुझ्या केस झटकण्यात,सावरण्यात,भासते एक हवेची लहर,
तुझी चढ़ती नजर आणते, सुकल्या रानी, प्रणय बहर;
तू आळसून जेंव्हा,मान फिरवतेस डाव्या खांदी,
वाटते जाई,जुईच्या वेली एक,लचकती फांदी;
तुझ्या हलुवर मृदु बोलण्यात,घेतेस जेंव्हा अवसर,
भासते हवे झुळकी,गळल्या पनान्न्ची सरकती सर सर;
वाटते रसाळ फळी परडी,जेंव्हा गाठी चोळी कसतेस,
एक चित्रकाराची आकृति,जेंव्हा विचारी असतेस;
वाटतं घन भरून आले,जेंव्हा काजळ घालतेस,
कडाडते मनी वीज,जेंव्हा लचकुन चालतेस;
एक खुलत्या सांजी,आलेलं झाकोळ,जर कधी रुसतेस,
खडा फेकल्या पाण्यात लहरी,जेंव्हा तू हसतेस;
जीवघेणी थट्टा,जर कधी हट्टावून,चित्ती भंगतेस,
एक उत्तुंग मदमाती पौर्णिमा,जेंव्हा माझ्याशी प्रणयी रंगतेस;
रसवंतीचा गळता रस,जर विडा रंगतो ओठी तांबडा,
पिळवटून निघतो जीव,हाथ वर्तावून जेंव्हा कसते अंबाडा;
अझून काय सांगू,तुला बघताच शहारतो अंगी हिवाळा,
तू नसते ते क्षण,जसे वाळू सर्क्तीत,शुष्क उन्हाळा;
नैसर्गिक वसुंधरेला,जसे वसंताचे पाठबळ,
तसंच,मनातल्या प्रणय ऋतूला,कधीच नसते गं पानगळ.
चारुदत्त अघोर.(२९/६/११)