Author Topic: "वृद्ध नाही होणार".....चारुदत्त अघोर.  (Read 2050 times)

Offline charudutta_090

  • Jr. Member
  • **
  • Posts: 185
  • Gender: Male
  • A fall leaf of autumn,....!!
ॐ साईं.
"वृद्ध नाही होणार".....चारुदत्त अघोर.(५/५/११)
ह्या हृदयाच्या श्वास धापा,तुला कश्या कळणार,
तुला नाही समजत म्हणून, मीच किती हाथ तळवे मळणार;
तुझ्या निश्पाप्तेचे हावभाव,हे सर्व कसं समजणार;
यौवनात असली तू,कधी त्यातली प्रेयसी उमजणार;
माझ्या वादळी विचारांना,कधी दिशा मिळणार,
आभाळी दबली वीज तू,कधी कडाडणार,
तुझ्या अबोध स्वभावातून, बहरून कधी लावण्णार,
नुकतीच हिर्वीत शाख तू,कधी गं पालवणार;
पहिली श्रावण सारी,ओथंबून तू कधी बरसणार,
या सर्व तुझ्या छटांन करिता,किती अझून मी तरसणार;
तुझे आवळले केस,कधी कोर्डवून मोकळे पसरणार,
एक घसरती बट,माझ्या हृदयाचे कधी ठोकळे करणार;
तुझ्या मिस्कील नजरेत,कधी गं शृंगार छटा भावणार,
या डोळ्यांच्या पुतळीत,कधी संपूर्ण मीच मावणार;
तुला यौवन वृत्तीत येण्याची मी, कायम का वाट बघणार,
तुझ्या प्रीतीत रसायला मी,कधीच वृद्ध नाही होणार.....!!
चारुदत्त अघोर.(५/५/११)