Author Topic: "पुढली ओळ लिहू गं कशी...?"©चारुदत्त अघोर  (Read 2570 times)

Offline charudutta_090

  • Jr. Member
  • **
  • Posts: 185
  • Gender: Male
  • A fall leaf of autumn,....!!
ॐ साईं.
"पुढली ओळ लिहू गं कशी...?"©चारुदत्त अघोर.(१/८/११)
चहु कडे कंच हिरवळ आज, बहरली जशी,
श्रावण मासी गगनी, ऊत आली कशी,
मनाला,चिंब भिजवून, निघून गेली जशी,
पण तू नसताना...पुढली ओळ…., लिहू गं कशी...?

त्या सुकल्या झाडावर, कोवळी पालवी फुटली जशी,
माझी मखमली भावना ही, आज मोहरली तशी,
दूर दूर पसरली हिरवळ,मनी गारावली जशी;
पण तू नसताना...पुढली ओळ…., लिहू गं कशी...?

निळ्या नभी,डोंगरकडा वेगे धावली जशी,
भरल्या ढगी पक्षांनी,उंच भरारी घेतली तशी,
इच्छा मनी स्वैर होऊन, थरारली जशी,
पण तू नसताना...पुढली ओळ…., लिहू गं कशी...?

हिरव्या डोंगरी,काळ्या दगडी,फुटून झरी बरसली जशी,
बेधुंद होऊन,धारी नहावी,वासना अंगी तरसली अशी,
बाहूत नसता तू ,कोरड्या मनी ओल, ती येईल का जशी;
पण तू नसताना...पुढली ओळ…., लिहू गं कशी...?

नुसतीच थंडीत हवा,अंगी झोम्ब्तेय अशी,
उत्तुंग रसना लटकून ,मनी लोम्ब्तेय जशी;
ही रसाळ फळीत डहाळी,ओढून तोडावी मशी;
पण तू नसताना...पुढली ओळ…., लिहू गं कशी...?

शेवाळीत कंच पारव्या अंगणी,बगळे येऊन शुभ्रावी जशी,
माझ्या कोर्या मन पानांवर,काही गीते कोरावी तशी;
तुझ्या बहरीत आठवणींनी,तूडूंब भरावी आस जशी,
पण तू नसताना...पुढली ओळ…., लिहू गं कशी...?

तुझ्या पदारीच्या,दुधाळ सुगंधी, मान डूल्कावी जशी,
काही थेंबी प्रणय सोशून,ओठी धार, हेल्कावी जशी;
त्या रोमांचित मांडी डोकावून,पदरी झाकून आडावी कुशी;
पण तू नसताना...पुढली ओळ…., लिहू गं कशी...?

ये गं सखे,तुझ्या पाउली,काही शब्द कोर अशी,
मनाच्या रचल्या कवितेला,संग्रही, ग्रंत्थवेल जशी;
तुझ्या आडी माझा श्वास,गुंतवून धागवू, एक स्मरणिका अशी;
पण तू नसताना...पुढली ओळ…., लिहू गं कशी...?
चारुदत्त अघोर.©(१/८/११)