ॐ साईं.
“पोर्ट्रेट”…. चारुदत्त अघोर.(२६/४/११)
मला चित्रकलेची आवड,पहिल्यापासूनच होती,
तू यास अजाण होती,कारण तुला माहित नव्ह्ती;
स्वतःच्या आत्मिक जीवनाशी,जेव्हा व्यस्त राहायचो,
तेव्हाच,ब्रश आणि रंग, केनव्हास वर भरायचो;
किती तरी सुरेख बालांची,चित्र मी ह्यावर आखली,
पण तू आल्यावर सगळी,माळ्यावर फेकली ;
कारण तू येताच सगळ्याजणी,तुझ्यातच दिसल्या,
तुझ्या एका हस्यातच,जश्या हजारो हसल्या;
आज वाटलं तुला बसवून, तुझंच एक पोर्ट्रेट काढावं,
ब्रश आणि रंगांशी आज, मनसोक्त लढावं;
एक पारदर्शी वस्त्रात, तुला पलंगी टेकवली,
तुझी बेधुंद पोज सेट करून,आधी रेशी रेखवली;
वस्त्रातून दिसणारी तू,आज लेणच वाटली,
अजंता स्वरूप तुझ्यातच आहे,हि ओळख आज पटली;
माझ्या ब्रश चे स्ट्रोक्स,डुबून रंग भरत होते,
आंतरिक उत्तुंग भाव,मन कठीणतेने धरत होते,
पेंटिंग पूर्ण होत असता,तू हललीस म्हणून चित्त भंगलं,
देही वस्त्र घसरलं पाहून,केन्व्हासच तंगलं;
या अवस्थी पाहून,कळेना ते कि हे,काय चांगलं,
पण अंतर्मनी खात्रीने वाटलं,कि आज माझं मॉडेल पोर्ट्रेट खर्या अर्थी रंगलं.
चारुदत्त अघोर.(२६/४/११)