Author Topic: तिचे रूप, तिचा वेग {शृंगारिक कविता }  (Read 4482 times)

Offline janki.das

 • Jr. Member
 • **
 • Posts: 76
तिच्या गो-यापान देहाला चांदणं लगडतं
तिच्या पाठीचं गोंदण उगाच् फुरंगटतं

तिला स्पर्शताना वारा अजूनच् मंद
परिमळ त्याचा करतो आसमंत धुंद

बटा तिच्या हतबल, किती झाकणारं
चंद्र चुंबितो चेहरा, किती वाचवणारं

तिच्या गात्रातून सा-या सांडे तृप्तीची साय
कधी खुशीत कुशीत, कधी कुशीत खुशीत

तिचे रूप, तिचा वेग, सारे लावण्याचे लेणे
मिळता मिळता निसटतं हे यौवनाचे देणे

-- जयंत विद्वांस 

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...

Offline Amolshashi

 • Newbie
 • *
 • Posts: 24
 • Gender: Male
 • BELIVE IN YOURSELF