Author Topic: कधीकधी......(fantasy un censored)  (Read 5989 times)

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
कधीकधी......(fantasy un censored)
« on: February 19, 2013, 01:51:00 PM »
 आयुष्यभर चौकटीतच राहीलो
बाहेर पडणं झालंच  नाही
सगळं काही दिलं पण
हवय काय ते पाहिलंच नाही

अचानक आलेल्या श्रावण सरींत
भिजणं कधी झालंच नाही
सहज कधी पडद्याआड
ओझरतं काही केलच नाही

उसळणार्या लाटांत भिजलो
किनारा सोडणं झालंच नाही
जवळ घेऊन कधी स्वताहून
लाटा उठवणं झालंच नाही   

बुडत असताना भरतीतही
भान कधी सुटलच नाही
एक तरी अंगावर उरलं
सगळं वाहून गेलंच नाही

तरुणपण दक्षतेत गेलं
भान कधी सुटलंच नाही
म्हातारपणी बेभान व्हायला
आता काही उरलंच नाही   

तसं पाहिलं तर ह्या मुळे
फार काही हरवलं नाही
तरी सुध्धा वाटत राहिलं
काहीतरी सापडलंच नाही 

प्रयत्न केला समजून घ्यायचा
वाईट कोणीच वागलो नाही
डोळ्यात तरीही पाणी आलं
का? ते मात्र कळलंच नाही!

केदार...Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ganesh Naidu

 • Newbie
 • *
 • Posts: 40
 • Gender: Male
Re: कधीकधी......(fantasy un censored)
« Reply #1 on: March 22, 2013, 05:37:35 PM »
khup chan kavita ahe KEADAR

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: कधीकधी......(fantasy un censored)
« Reply #2 on: March 23, 2013, 12:30:42 PM »
Thank you Ganesh. Rahun gelelya ichcn bddl hi ek pratikatmk kavita ahe. Mala swtahal hi majhich kavita asun hi hya kavitetali shevatchi don kadvi saglyat jast bhavuk an arthpurn vatat.
« Last Edit: March 23, 2013, 12:32:58 PM by केदार मेहेंदळे »

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: कधीकधी......(fantasy un censored)
« Reply #3 on: March 23, 2013, 01:40:06 PM »
म्हातारपणी बेभान व्हायला
आता काही उरलंच नाही   

डोळ्यात तरीही पाणी आलं
का? ते मात्र कळलंच नाही!

आवडलंय! अप्रतिम! :) :( :'(

Offline sylvieh309@gmail.com

 • Jr. Member
 • **
 • Posts: 104
 • Live your Life & make others to live it
Re: कधीकधी......(fantasy un censored)
« Reply #4 on: March 24, 2013, 03:09:34 PM »
it shows you are reserved person

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
Re: कधीकधी......(fantasy un censored)
« Reply #5 on: April 05, 2013, 10:26:50 PM »
kedar, hi shrugarik madhye ka takali .mala gambhir vatate,virah madhye hi chalu shakel.

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: कधीकधी......(fantasy un censored)
« Reply #6 on: April 06, 2013, 09:17:27 AM »
विक्रांतशी सहमत....
कविता आवडली.

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: कधीकधी......(fantasy un censored)
« Reply #7 on: April 08, 2013, 12:43:39 PM »
karan hyat rahun gelelya bhavana hya shrungaratalya rahun gelelya goshtishi nigadit ahet. lihilelya olit lapalela khara arth toch ahe...mhanun ithe takali...

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: कधीकधी......(fantasy un censored)
« Reply #8 on: April 08, 2013, 03:59:20 PM »
खर आहे केदार दादा, पण शृंगारिक प्रकारच्या भावना त्या प्रकारे पुढे आलेल्या नाहीत. अलवारपणे पुढ आल्यात. मग इथे का पोस्ट केलीस?
असो...काय फरक पडतो? कविता छान आहे न, झाल तर मग ! या बाकी गोष्टी माफ आहेत तुला!

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: कधीकधी......(fantasy un censored)
« Reply #9 on: April 08, 2013, 04:33:58 PM »
Thanks