Author Topic: * वेडी प्रीत तुझी न् माझी *  (Read 2790 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
* वेडी प्रीत तुझी न् माझी *
« on: September 30, 2014, 07:20:46 AM »
**तो आणि ती **
--------------------------------

नळावर पाणी भरताना हळूच,
तिच्या अंगावर पाणी शिपंडणारा 'तो'...
डोळे मिटून चेहर्यासमोर हात आणत,
'काय रे हे तुझं गप्प ना'असं बोलणारी 'ती'...

अलगद तिचा नाजुक हात पकडून ,
तिला आपल्या जवळ ओढणारा 'तो',
अन्  पाण्याच्या कारंज्याखाली,
आज चिबं चिबं भिजलेली वेडी "ती"...

नकळत तिच्या कमरेभोवती हात टाकून,
तिला प्रेमाने विळखा घालणारा "तो",
त्या पहिल्या अश्या मुक्या स्पर्शाने ,
जराशी शहारुन बावरलेली वेडी "ती"...

अलगद तिच्या भिजलेल्या केसाना,
मागे सारुन कानाला चावणारा "तो",
जराशी धुदं होवून वेडी लाजलेली,
त्याच्या मिठीत हरवुन जाणारी "ती"...
आज तिच्या प्रेमात धुदं न्हाऊन
चिबं चिबं भिजलेला वेडा  "तो",
अन् सवे आज देहभान हरवून,
मिठीत घेवून साथ देणारी वेडी "ती"...!!

www.aishwswapn143.blogspot.com
--------------------------------
 " स्वप्नील चटगे "
--------------------------------
« Last Edit: September 30, 2014, 03:42:33 PM by Lyrics Swapnil Chatge »

Marathi Kavita : मराठी कविता


saddy

  • Guest
Re: * वेडी प्रीत तुझी न् माझी *
« Reply #1 on: December 17, 2014, 05:33:43 PM »
MAST...