नशिले आज डोळे हवा धुन्द झाली
सखी तुझ्या रुपाने आभा ग लाजली
जशी केतकी तशी तुझी गौरकाया
महिरप कुन्तलान्ची करी घायाळ नजरा
यौवनाची तुझ्या बाग बघ फुलली
सखी तुझ्या रुपाने आभा ग लाजली
थान्ब जराशी नको ना हा दुरावा
अन्गास बघ झोम्बतो वेडा खट्याळ वारा
नजर का तुझी आज अर्धोन्मिलीत झाली
सखी तुझ्या रुपाने आभा ग लाजली
मोर तुझ्या ज्वानीचा थुइथुइ ग नाचतो
वेडा भ्रमर कळीला हलकेच जागवतो
स्वप्न साकारले माझे या सन्धीकाली
सखी तुझ्या रुपाने आभा ग लाजली
सुप्रिया