Author Topic: पाउस  (Read 2127 times)

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
पाउस
« on: June 18, 2013, 12:16:26 PM »
 अवचित पावसाची
सर सर सर
कौलांवर धारांची
तड तड तड
 
वाहणारे ओहळ
खळ खळ खळ
पडणार्या पागोळ्या
चळ चळ चळ

सोसाट्याचा वारा
पळ पळ पळ
माडाच्या झावळ्यांची
सळ सळ सळ

कडाडता वीज
कड कड कड
रीधयात माझ्या
धड धड धड

मिठीत मजला
भर भर भर
पेटव  साजणा
कण कण कण

भिजलेल्या बांगड्यांची
किण किण किण
डोक्यात स्पर्शाची
झिंग झिंग झिंग

ओठांशी ओठांचा
मेळ मेळ मेळ
प्रणयाचा रंगला
खेळ खेळ खेळ

श्वासांत एकच
लय लय लय
हवसं वाटणारं   
भय भय भय 

कपड्यांचा गळता
भार भार भार
मिठीत पेटला
जाळ जाळ जाळ

शरीरांनी धरला
ताल ताल ताल
शृंगाराचा चढला
ज्वार ज्वार ज्वार

अंगावर तुझा
भार भार भार
दुखावून सुखावणारा
वार वार वार

वार्याचा ज्योतिषी
मेळ मेळ मेळ
भिंतीवर सावल्यांचा
खेळ खेळ खेळ

झोपडीतल्या दिव्याची
फड फड फड
थकलेल्या चाळांची
खळ खळ खळ

आंगणात भिजलेली
केळं केळं केळं
मिठीत थांबलेली
वेळ वेळ वेळ

थांबलेला पाउस
शांत शांत शांत
मिठीत आपण
क्लांत क्लांत क्लांतकेदार....

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: पाउस
« Reply #1 on: June 18, 2013, 01:06:06 PM »
रीधयात>>>>'हृदयात' म्हणायचं आहे वाटत.....

Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: पाउस
« Reply #2 on: June 18, 2013, 01:21:45 PM »
bharich..... :)

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: पाउस
« Reply #3 on: June 18, 2013, 02:54:26 PM »
Kedar sir...
... Avadha apratim fakta tumhich lihu shakata.
« Last Edit: June 18, 2013, 03:06:23 PM by Prajunkush »

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: पाउस
« Reply #4 on: June 18, 2013, 04:16:09 PM »
छान आहे….पाऊस गाणं ..........
पाऊस पण श्रुंगार करतो वाटते ......
 :D :D :D

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: पाउस
« Reply #5 on: June 18, 2013, 04:28:35 PM »
 :) :)मस्तच आहे एक तर तुमचं लिखाण अन पावसात भिजलेला प्रणय …………. वाह क्या बात है ।  :) :) :) :)

Re: पाउस
« Reply #6 on: June 19, 2013, 08:41:22 PM »
kedar sir
lay bhari  lay bhari

Offline Shona1109

 • Jr. Member
 • **
 • Posts: 64
Re: पाउस
« Reply #7 on: June 24, 2013, 01:58:36 PM »
Khup sundar

Offline कवि - विजय सुर्यवंशी.

 • Jr. Member
 • **
 • Posts: 478
 • Gender: Male
 • सई तुझं लाघवी हसणं अजुनही मला वेड लावतं.....
Re: पाउस
« Reply #8 on: June 29, 2013, 12:24:47 PM »
केदारजी कविता वाचताना प्रणयाचे चित्र खरेच डोळ्यासमोर तरळले....
अतिशय वेगळ्या शैलीने आपण भाव प्रगट केले आहेत....
.
.
.
कपड्यांचा गळता
भार भार भार
मिठीत पेटला
जाळ जाळ जाळ
शरीरांनी धरला
ताल ताल ताल
शृंगाराचा चढला
ज्वार ज्वार ज्वार
अंगावर तुझा
भार भार भार
दुखावून सुखावणारा
वार वार वार
वार्याचा ज्योतिषी
मेळ मेळ मेळ
भिंतीवर सावल्यांचा
खेळ खेळ खेळ..... छान.. :p