Author Topic: “पाऊस खुप वाई‍‍‍ट असतो”  (Read 1304 times)

Offline eknatha@rediffmail.com

  • Newbie
  • *
  • Posts: 6
पाऊस खुप वाई‍‍‍ट असतो  || ध्रु ||
साचलेल्या डबक्यात, ठिपक्यांचा नाद असतो
पत्र्यांच्या छतावर तडम ताशा चा बाज असतो ||१||
 
डोंगर माथ्या वर कोसळणारा, बेबंद टोळ असतो
चिंब भिजल्यावर जिवांना, बेहोशीचा डोस असतो ||२||

अस्वस्थाच्या मुळात, गारव्यात ला मद असतो
विरहाच्या भिंती तोडून, मिलनाची साद असतो ||३||

मुक्त योग्याच्या अंतरंगात, दडलेला अवलिया असतो
फुलांची अत्तर कुपी उधळणारा, रात राणीचा राजा असतो ||४||

पाऊस खुप वाई‍‍‍ट असतो  || ध्रु ||

-रमाकांत
ramakantkavya.blogspot.com

© copy right protected
« Last Edit: July 21, 2013, 08:02:42 PM by eknatha@rediffmail.com »

Marathi Kavita : मराठी कविता


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
पाच अधिक नाऊ अधिक शून्यं  किती ? (answer in English number):