Author Topic: लावणी  (Read 1674 times)

Offline aap

  • Jr. Member
  • **
  • Posts: 94
लावणी
« on: July 13, 2013, 11:10:31 AM »
लावणी

कात , सुपारी वरती चुना

देते पंचप्राणाचा विडा

अहो राया तुम्ही धरू नका हात माझा सोडा

भरला हातामध्ये हिरवा चुडा

धरला हात पिचकला थोडा

अहो राया तुम्ही धरू नका हात माझा सोडा

घातला मानेवरी सॆल अंबाडा

वरी माळा वेणी केवडा

अहो राया तुम्ही धरू नका हात माझा सोडा

आली रात रातराणीचा सडा

तुम्ही धाडा पंचकल्याणी घोडा

अहो राया तुम्ही धरू नका हात माझा सोडा

                                   सौ. अनिता फणसळकर       

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: लावणी
« Reply #1 on: July 13, 2013, 12:27:58 PM »
va madam..mast lavani...tondat bbot ghalun  shitti vajavavishi vatali