Author Topic: आभास तुझा...  (Read 4050 times)

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,270
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
आभास तुझा...
« on: December 07, 2013, 02:22:15 PM »
आभास तुझा...

आभास तुझा होताच आज
स्मृंतीचे चाळवून जाणे,
नसता जवळ तुझ्या परी
आठवणीत माझे हरवणे !

येऊन स्वप्नात रोज माझ्या
ते हळूवर स्पर्शून जाणे,
रुंजी घालणाऱ्या सुरांचे
कानावर मधुर ते पाघरणे !

ओलसर कुंतलातून गंधीत
मोगऱ्याचे सुद्धा विखुरणे,
उशीवर ठेऊन हाताच्या डोके
मिठीत हलकेच ते विरघळणे !

काळवेळ स्तब्ध होऊन सारी
वाऱ्याचे मखमली विहरणे,
थंडीत गोड पहाटे गुलाबी
मोरपंखी ते शहारून येणे !


©शिवाजी सांगळे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: आभास तुझा...
« Reply #1 on: February 07, 2014, 01:44:04 PM »
chan...... :)

Offline vijaya kelkar

 • Jr. Member
 • **
 • Posts: 314
Re: आभास तुझा...
« Reply #2 on: February 08, 2014, 01:49:13 PM »
                आभास तुझा ----रम्य भासे

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,270
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
Re: आभास तुझा...
« Reply #3 on: April 27, 2014, 01:43:21 PM »
धन्यवाद मित्रांनो....