Author Topic: …जराशी….जराशी  (Read 2961 times)

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
…जराशी….जराशी
« on: December 18, 2013, 05:35:49 PM »
येता समीप तू जडावून थोडी
फुलू लागली रात….जराशी….जराशी
 
सैलावून येता तू मिठीत माझ्या
बिलगून बहरली….जराशी….जराशी
 
फुलवून स्पर्शाची फुले साजणी तू
चढवली नशा ही….जराशी….जराशी
 
पेटवित गेली तू गात्रांस माझ्या
अशा नग्न रात्री….जराशी….जराशी
 
प्रणयात भिजुनी हुंकारली  तू …
शरीरावर ग्लानी….जराशी….जराशी
 
दमून दोघे…. कोसळलो सुखानी
सरुदे अशी रात….जराशी….जराशी
 
वळली थकून तू दुसर्या कुशीला
हवी साथ अजुनी….जराशी….जराशी
 
विझलीस अशी का इतक्यात राणी
अजुनी रात बाकी….जराशी….जराशी
 
 
 
केदार….

Marathi Kavita : मराठी कविता


Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,265
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
Re: …जराशी….जराशी
« Reply #1 on: December 19, 2013, 10:23:48 AM »
क्या बात है केदार,

विझलीस अशी का इतक्यात राणी
अजुनी रात बाकी….जराशी….जराशी
.......

हुंकार ऐकण्यासाठी तूझा मधुर तो,
ये ना कुशीत अजून...जराशी….जराशी

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,265
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
Re: …जराशी….जराशी
« Reply #2 on: December 20, 2013, 04:48:50 PM »
Thanks Kedar, this makes supporting and positive insperation to all.....

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: …जराशी….जराशी
« Reply #3 on: December 27, 2013, 03:08:18 PM »
येता समीप तू जडावून थोडी
फुलू लागली रात….जराशी….जराशी


     छान ...........

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,265
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
Re: …जराशी….जराशी
« Reply #4 on: December 27, 2013, 04:53:17 PM »
पुन्हा म्हणावसं वाटत ....

हुंकार ऐकण्यासाठी तूझा मधुर तो,
ये ना कुशीत अजून...जराशी….जराशी