Author Topic: पण एक सांग ..?  (Read 2401 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,265
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
पण एक सांग ..?
« on: January 09, 2014, 10:12:04 AM »
पण एक सांग ..?

   
किरणां अगोदर पहाटे
नित्य तू स्वप्नात असते !
मध्यानीच्या उन्हात सुद्धा
तुझी आठवण सावली असते !

झुडपात दडणाऱ्या सूर्यासह,
तुझ्या अस्तित्वाची साथ असते !
निरव रात्रीच्या कुशीत सुद्धा
चंद्रासोबत तूच असते !

तरीही सतत म्हणतेस?
तुला मात्र दूर गेल्यावर,
माझी आठवण होते !
म्हणायचं अस कधी-कधी,
फारच सोप असत !

दूर असल्यावर मी,
जेव्हा – केव्हा...
तू तर नक्की रागवायचं असत !
पण एक सांग? मनातलं सार...
सगळ्यां देखत सांगायच असत ?


©शिवाजी सांगळे
« Last Edit: January 09, 2014, 10:12:32 AM by शिवाजी सांगळे »

Marathi Kavita : मराठी कविता