Author Topic: मिलन  (Read 2466 times)

Offline sunitav

  • Newbie
  • *
  • Posts: 30
मिलन
« on: February 04, 2014, 07:34:04 PM »
अनुभूती प्रेमाची
अंगावर शिरशिरी
तुझे अधर माझ्या अधरावरी
प्रीतीची तुझ्या मोहोर
उमटवली तू अशी
अपादमस्तक उठले रोमांच
नेत्रही मिटले आपोआप
घेण्या ते अलौकिक सुख

तो क्षण प्रेमाचा
होता आपल्या साक्षीला
प्रेम पाहून आपले
होता तोही भारावला
त्याला पण वाटले असेच थांबावे
मिलन आपले कधी न संपावे
सुनिता .

Marathi Kavita : मराठी कविता