Author Topic: ती... रात्र होती  (Read 2971 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,266
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
ती... रात्र होती
« on: July 04, 2014, 09:51:57 AM »


शोषून गंध मोगऱ्याचा
दरवळत रात्र होती!
धुंद सुगंध स्वासांचा
साठवित रात्र होती!
गात्री हळूवार स्पर्शानी
रोमरोमात रात्र होती!
पिउन चांदणे सुखाचे
तहानलेली रात्र होती!
तुझ्या नी माझ्या
मिलनाची रात्र होती!

© शिवाजी सांगळे

Marathi Kavita : मराठी कविता