Author Topic: मन पवसाळलेले...  (Read 3303 times)

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,191
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
मन पवसाळलेले...
« on: July 24, 2014, 08:48:07 PM »थांबला पाऊस तो
आभाळ मोकळे झाले,
गोठल्या गत स्मृतींचे
मळभ भरून आले !

चालून पाय थकलेले
चिंबगार ते भिजणे,
धरून हात ओलेते
उबदार ते थरथरणे !

ओढीने अज्ञात हव्याशा
नजरेने वारंवार पहाणे,
पुन्हा चिंब बिलगण्या
गळक्या छतात विसावणे !

मनधुंद स्वार वाऱ्यावर   
तनुगंध उष्ण श्वासांचे,
नकळत मिठीत येता
विसर ओलसर कायेचे !

करून मृदेस गंधित
पावसाने हिरवे केले,
होऊन तृप्त तरीही
मन उगी पावसाळलेले !


©शिवाजी सांगळे

Marathi Kavita : मराठी कविता

मन पवसाळलेले...
« on: July 24, 2014, 08:48:07 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,415
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: मन पवसाळलेले...
« Reply #1 on: September 27, 2014, 04:15:40 PM »
chan...... :)

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,191
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
Re: मन पवसाळलेले...
« Reply #2 on: November 02, 2014, 08:54:27 AM »
thanks milind...

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले नाऊ  किती ? (answer in English number):